माण महसुल नरवणे गावच्या तलाठ्यांना गावातून काम करण्याचे आदेश का देत नाहीत जनतेला होणारा त्रास तहसीलदार यांच्या आदेशानुसार होत तर नाही ना जनतेला प्रश्न पडलाय अन्यथा लवकरच जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करण्याचा युवकाचा निर्णय
नरवणे गावच्या तलाठ्यांचा विरोधात स्थानिक प्रशासन लक्ष देत नसेल, तलाठी गावातून कामकाज करत असतील तर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करण्याचा व वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा इरादा गावातील युवकांनी घेतला आहे.
नरवणे गाव चे तालाठी दहिवडी येथून कामकाज करत आहेत गावातील लोकाना दहिवडी येथे जाऊन आपली कामे पूर्ण करावी लागत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना एक दाखला काढायचा असल्यास त्या विद्यार्थ्यांना दहिवडी येथे पायपीट करावी लागते तरीही तेथे हे तलाठी महाशय भेटतील असे सांगत येत नाही लोकांनी फोन करून विचारणा केली तर मी कामानिमित्त बाहेर आहे पुन्हा भेटू अशीच यांची पद्धत असते गावातील लोकाना एक सातबारा पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला कोणीतरी तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोधावे लागते त्या नंतर सातबारा काढण्यासाठी पैस्याचा आकार तर वेगळाच असतो अश्या मुजोर तलाठ्यांना प्रत्येक दिवशी गावच्या तलाठी कार्यालयात बसण्यासाठी माण तहसीलदार व उपविभागीय अधिकारी आदेश देतील काय? इतके दिवस महसूल अधिकारी तालुक्यातील नरवणे गावचे तलाठी गावात जात नाही या बाबत गप्प कसे काय आहेत? हा पण प्रश पडत आहे. दहिवडी येथे मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून हे तलाठी मंडल अधिकाऱ्याचे काम करतात काय कारण हे मंडल अधिकारी पण यांना गावात जाऊन काम करण्याचा सल्ला देत नाहीत हे फार मोठे विशेष
लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून या गैरसोय करणारे तलाठी या पुढेही गावात येऊन काम करतील काय?
वरिष्ठ अधिकारी नरवणे गावचे तलाठी यांना गावातून काम करण्याचे आदेश देतील काय?











