अखेर कामोठे येथील धोकादायक विद्युत जनित्राची संरक्षण भिंत बांधण्यास महावितरणने दाखविली तत्परता!

पनवेल राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष विलास खरटमोल यांच्या पाठपुराव्याला यश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लाईव्ह महाराष्ट्र 24।  पनवेल । विशेष प्रतिनिधी।

कामोठे येथील थारवानी रेसिडेन्सी समोरील विद्युत रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) असलेल्या संरक्षण भिंतीची मोठ्या प्रमाणात  दुरवस्था  झाल्यामुळे येथील रहिवाशांना याचा विजेचा धक्क्का बसण्याचा धोका निर्माण झाला  होता. या  रोहित्राच्या बाजूलाच गगनचुंबी इमारती असल्यामुळे येथील इमारतींच्या गॅलरीजवळूनच विद्युत वाहक तारा गेलेल्या आहे. मात्र या रोहित्राच्या संरक्षण कठड्याची दुरवस्था झाल्यामुळे वर्दळीमुळे येथून येणार्‍या जाणार्‍यांची प्रचंड गेरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विजेचा धक्का लागून अपघातही होण्याची दाट शक्य आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना याकडे मात्र महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष्य झाले. परिणामी येथील रहिवाशांची गैरसोय तसेच सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष विलास खरटमोल यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंते मिलिंद सुर्यतळ यांना वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. अखेर 10 महिन्यानंतर महावितरणच्या अधिकारर्‍यांनी याची दखल घेत येथील रोहित्राच्या सभोवती संरक्षण भिंत सुस्थितीत करण्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. 

या ठिकाणी पूर्वी इमारती नसल्यामुळे  हा जनित्र मोकळ्या जागेत उभारला होता. मात्र सध्या त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्यामुळे येथील रोहित्र इतरत्र हलविणे अथवा त्याची योग्य देखभाल होणे अत्यावश्यक होते. रोहित्राच्या आजूबाजूच्या भूखंडावर जास्त प्रमाणात गवत वाढले असून सुकले आहे. तसेच या ठिकाणी वारंवार शॉर्ट सर्किटचेही प्रकार घडत आहेत. या ठिकाणी तारांचे कुंपन तसेच संरक्षण भिंतही असणे गरजेचे आहे. मात्र या भिंतीची कमालीची दुरवस्था झाल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचीही भीती निर्माण झालेली आहे.
अशा प्रकारचा अनर्थ या ठिकाणी घडू नये यासाठी कामोठे, सेक्टर 6, थारवानी प्लॉट क्रमांक सी 1, येथील विद्युत रोहित्र इतर ठिकाणी हलवावे अथवा याची दुरुस्ती करत रोहित्राच्या भोवती दर्जेदार संरक्षण भिंत उभारण्यात यावी. महावितरणला या मागणीचे निवेदन पनवेल राष्ट्रवादी युवकच्या वतीने वेळोवेळी देण्यात येत होते. याची दखल घेत अखेर महावितरणच्या अधिकार्‍यांसह राष्ष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्र्ंकडून रोहित्राच्या सभोवतालची संरक्षण भिंत सुस्थितीत करण्यासाठीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.

भूमिपूजन कार्यक्रमास यांची होती उपस्थिती…
थारवानी रेसिडेन्सी समोरील ट्रान्सफॉर्मर सुस्थितीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी हे काम चालू केले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरदास गोवारी यांच्या हस्ते रोहित्राच्या संरक्षण भिंतीच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजिनाथ सावंत, पनवेल शहर, जिल्हा उपाध्यक्ष बबनराव पवार, बळीराम नेटके, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल, युवक जिल्हा उपाध्यक्ष विलास खरटमोल, लीगल सेल जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. पवन गायकवाड, नविन पनवेल शहर उपाध्यक्ष विजय भोसले, शशिकांत करंजुले, स्वप्नील काटकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कामोठे येथील थारवानी रेसिडेन्सी समोरील विद्युत रोहित्राची संरक्षण भिंत कमालीची दुरवस्था झालेली आहे. मात्र याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात होते. मात्र पनवेल राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष विलास खरटमोल यांनी महावितरणचा पाठपुरावा काही सोडला नाही. अखेर महावितरणला त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घ्यावी लागली. येथील विद्युत रोहित्र अत्यंत जुना आहे. ज्यावेळी या रोहित्राच्या अजुबाजूला इमारती नव्हत्या. त्यावेळी मोकळी जागा पाहून हा रोहित्र या ठिकाणी उभारण्यात आला होता. मात्र कालांतराने महावितरणकडून याची योग्यप्रकारे देखभाल करण्यात आलेली नाही. या ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे तसेच संरक्षण भिंतीची झालेली दुरावस्था त्यामुळे विजेचा धक्का लागून मोठमोठे अपघातही होण्याचे अनर्थ घडू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच सजग राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास तत्पर असते. याचा एक भाग म्हणून पनवेल युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विलास खरटमोल यांनी लोकहिताचे काम केले आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

-सूरदास गोवारी, प्रदेश सचिव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *