साताऱ्याची सुकन्या मुंबई पोलीस दिपालीने लावले जनतेच्या मनात दिप
कोविड – १९ च्या काळातील दिपालीची जाँँबाज कामगिरी
सातारारोड दि.३ ( प्रतिनिधी ) – साताऱ्याची सुकन्या व सध्या मुंबई पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या वाई तालुक्यातीलकाळंगवाडीच्या दिपाली मोहोळकर यांनी कोरोना काळात चमकदार कामगिरी करत जनतेच्या मनात दिप लावण्याचे विशेष काम केलेआहे. आज त्यांचे एक जाँबाज मुंबई पोलीस म्हणून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि लाँकडाऊन मध्ये सर्व परराज्यातील मजूर ,कामगार व जनतेला आपल्या घरी गावीजाण्याची ओढ लागली होती. ओढ लागली होती ती आपल्या कुटुंबातील सदस्य व प्रियजनांना भेटण्याची .
अशावेळी मुंबई मध्ये घरापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या लोकांना योग्य व्यवस्थापन तसेच कोरोना नियमांचे पालन करूनसामाजिक बांधिलकी जपत त्यांना त्यांच्या घरी ,गावी सुखरूप पाठवण्याची कामगिरी एकदम चोखपणे बजावली आहे. दिपाली रमेशमोहोळकर या कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहेत. लाँकडाऊनच्या काळात त्यांनी पोलीस स्टेशनच्याहद्दीतील व परराज्यातील प्रवाशांची यादी बनवून त्यांचे व्यवस्थितरित्या नियोजन केले. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयात माहिती पाठवली. संबधित कार्यालयाची परवानगी मिळवून संबंधितांना त्यांच्या गावी घरी रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदत केली.
सदर प्रवाशांना रेल्वे स्टेशन वर सोडण्यासाठी पास मिळवून देण्यापासून ते त्यांना रेल्वे मध्ये बसविण्यापर्यंत धडपड केली.याशिवायत्यांना रेल्वे स्टेशन येथे जाण्यासाठी बसची सोय सुध्दा उपलब्ध करून दिली. त्यांच्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील पाँझिटिव्हरूग्णासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
रूग्णालयाची माहिती घेऊन रूग्णांना बेड उपलब्ध करून देण
रूग्णालयाची माहिती घेऊन रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य व मदत केली.
जनतेच्या मनात पोलीसांबद्दल एक चांगली प्रतिमा तयार होईल यासाठी दिपाली मोहोळकर यांनी पोलीसातील माणुस म्हणूनआपले कर्तव्य पार पाडले.
दिपाली रमेश मोहोळकर या २००७ मध्ये मुंबई येथे पोलीस खात्यात भरती झाल्या. आजपर्यंत १४ वर्षे त्यांची पोलीस विभागातील सेवाझाली आहे. या कालावधीत त्यांनी सशस्त्र पोलीस नायगाव ,वाहतूक विभाग साकीनाका व घाटकोपर येथे काम केले. सध्या त्याकांजुरमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
याचे खरे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहे. त्यांचे आजोबा पोलीस खात्यात होते.
त्या नंतर वडील रमेश मोहोळकर ,चुलते सुरेश मोहोळकर ,सुभाष मोहोळकर ,चुलत भाऊ वैभव मोहोळकर पोलीस खात्यात होते .दिपालीयांचा भाऊ सुद्धा मुंबई येथे पोलीस विभागात आहे.आजही सर्व कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहत आहेत.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिपाली मोहोळकर म्हणाल्या की प्रचंड इच्छाशक्ती, जिद व कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य ,प्रेरणायामुळे मी पोलीस सेवेत रुजू झाले. आज मी उत्कृष्ट कामगिरी व सेवा बजावत आहे. हे सर्व काम माझ्या एकटीचे नाही. तर हे माझ्याटिमचे टीमवर्क आहे. आम्ही सर्वांनी मिळून मिसळून काम केले आहे. यासाठी माझ्या सर्व सहकारी वर्गाचे मला लाख मोलाचे सहकार्यलाभले.
मुंबई पोलीस दिपाली मोहोळकर यांचे फक्त मुंबई येथेच कौतुक होत आहे असे नाही तर सातारा जिल्हासह महाराष्ट्रातून त्यांचे कोविड–१९ च्या काळातील एक जाँबाज मुंबई पोलीस म्हणून कौतुक होत आहे.












Leave a Reply