देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आक्टोंबर मध्ये विस्तार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आक्टोंबर मध्ये विस्तार!

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे केंद्रात मंत्री होणार का याबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून भाजपच्या पाच मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे बोलले जाते, माननीय देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पडली याबद्दल केंद्रातील भाजपचे सर्वच नेते देवेंद्र फडणीस यांचा उल्लेख यशस्वी मुख्यमंत्री असा नेहमी भाषणात करतात त्याचबरोबर बिहार निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणीस यांच्या खांद्यावर देण्यात आली त्यामुळे देवेंद्र फडणीस भविष्यत केंद्रात राजकारणात जाणार की राज्य करणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. परंतु ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तारामध्ये देवेंद्र फडणीस हे मंत्री होऊ शकतात अशी अटकळ अनेकांनी बांधली असून कदाचित त्यांना संधी मिळू शकते, महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप एक नंबरचा पक्ष म्हणून विधानसभेमध्ये आज काम करतो देवेंद्र फडणीस यांचा राज्य त्याचबरोबर देशपातळीवर चा अभ्यास पाहता त्यांना अशा प्रकारची केंद्र संधी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच ऑक्टोंबर मध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांना संधी मिळणार का याबद्दल उत्सुकता आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *