मायणी – मुंबई सेंट्रल बस सेवा रविवार दि ११ रोजी पासून सुरु होणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मायणी – मुंबई सेंट्रल बस सेवा रविवार दि ११ रोजी पासून सुरु होणार.

वडूज आगाराचे मायणी – मुंबई सेंट्रल ही बस सेवा सकाळी दहा वाजता व्हाया . वडूज ,पुसेगाव , सातारा मेगा हायवे मुंबई इ अशी रविवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे तर मुंबई येथून सकाळी नऊ वाजता सुटून मायणी येथे दुपारी पाच वाजता पोहोचणार आहे. अशी माहिती वडूज आगारप्रमुख कुलदीप डुबल यांनी दिली. या सेवेत सोबत आगाराची वडूज – विटा -मुंबई व्हाया चितळी, पुसेसावळी, रहिमतपूर, मेगा हायवे मुंबई इ अशी रात राणी लवकरच सुरू होणार आहे तसेच निमसोड येथून नवीन मुंबई गाडी सुरू होत आहे. सदरच्या बसेस सुरू करण्यासाठी राज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांनी विशेष प्रयत्न केले .या बससेवेचा शुभारंभ युवा नेते यांच्या हस्ते व माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच एसटी अधीक्षक मोहन महाडिक यांच्या उपस्थितीत या बससेवेचा शुभारंभ होणार आहे तरी प्रवाशांनी मायणी येथील चांदणी चौकात साडेनऊ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन राजाराम कचरे यांनी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *