माण खटाव मधील स्थानिकांना भेडसावणार्या समस्यांसोबत कायदा सुव्यवस्थेचेही वाजलेत तिनतेरा;
आता नवनियुक्त अधिकार्यांकडून स्थानिकांना अनेक अपेक्षा..
.
लाईव्ह महाराष्ट्र 24 । माण । विशेष प्रतिनिधी ।
माण-खटात तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी तसेच शासन यंत्रणेमुळे व्यवस्थेची घडी पुरती विस्कटलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही अधिकारी गावाकडे फिरकलेच नसल्यामुळे स्थानिकांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. यांमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. माण-खटाव उपविभागीय अधिकारीपदी शैलेश सुर्यवंशी यांची तर विभागीय पोलीस अधिकारीपदी डॉक्टर निलेश देशमुख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्यांचे स्थानिकांनी जल्लोषात स्वागतही केले. मात्र आता हे दोन्ही अधिकारीयेथील स्थानिक जनतेला भेडसावणार्या समस्यांवर मार्ग काढतील, अशी अपेक्षा येथील जनतेला आहे. तर तालुक्यातील काही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेही गुन्हेगारीत वाढ झाल्याचे पहायला मिळतेय. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून उद्भवणार्या समस्यांचा पाढा येथील स्थानिकांनी ‘लाईव्ह महाराष्ट्र 24’कडे अनेकदा वाचला.
यामध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये माण तालुक्यामध्ये ढासळलेल्या प्रशासकीय यंत्रणेमुळे येथील सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. आजमितीला माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये काही तलाठी गेल्या 3 महिन्यांपासून साधे फिरकले सुद्धा नाहीत. एक तलाठी व दोन ते तीन सज्जा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. परंतु तलाठी हे कोणत्या सज्जामध्ये उपस्थित नसतात. अशा अनेक तक्रारी माण तालुक्यात आहेत. सर्वसामान्य जनतेने याबाबत आवाज उठवला. तर तलाठ्याच्या संपर्कातील व महसूल प्रशासनाच्या संपर्कातील तालुक्यातील शिवाय गावातील एखादा पुढारी सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचे काम करतात. स्थानिकांना शांत राहण्याचा सल्ला देतात. त्या व्यक्तीची समजूत काढतात. अशा प्रकारे या ठिकाणी सामान्य जनतेमध्ये दहशत पसरविण्याचा प्रकार सुरु आहे. तर काही तलाठी गावाकडे फिरकत सुद्धा नाहीत. एखादी माहिती गावातून ऑनलाइन घ्यायची असेल तर ती गावातील एखाद्या व्यक्तीकडून घेतली जाते. परंतु तलाठी गावांमध्ये उपस्थित राहत नाहीत. वेग-वेगळी कारणे सांगितली जातात. ऑनलाईन सातबारा प्रक्रिया सुरू आहे, असे गेले वर्षभर सर्वसामान्य जनतेला सांगितले जात आहे, प्रत्येक सज्जामध्ये एक कोतवाल आहे. कोतवाल सातबारा घेण्यासाठी लोकांकडून हप्ते वसुली केल्यासारखे पैसे घेतात, अशा अनेक तक्रारी तालुक्यांमध्ये आहेत. सातबारा मिळविण्यासाठी लोकांना दहिवडी येथे जावे लागते. परंतु, तालुक्याच्या शेवटच्या टोकावरून दहीवडीत येण्यासाठी दोनशे रुपयांचा खर्च होतो. काही ठिकाणी तर सातबारा साठी वेगळे पैसे आकारले जातात. अनेक सज्जामध्ये कोतवाल हा तलाठ्यांपेक्षा मोठा समजला जातो. आज सातबारा मिळवण्यासाठी सरकारचे काही दर निश्चित आहेत. परंतु त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जाते. याबाबत यापुढच्या कालावधीमध्ये आपण योग्य तपास करावा. प्रत्येक गावांमध्ये तलाठ्यांना वार, वेळ निश्चित करून देण्यात यावी. तसेच सर्वसामान्य जनतेला प्रत्येक गावांमध्ये तलाठी कधी येणार या संदर्भात जनजागृती करून त्यांनी योग्य तो दिवस आणि वेळ ठरवून गावांमध्ये दिवसभर सध्या कार्यालयात उपस्थित राहिल्यास जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागतील. जनतेला खूप मोठा दिलासा मिळेल.
गेल्या अनेक दिवसापूर्वी एका शहरांमध्ये पोलिस उपनिरीक्षका वरती हात उगारला होता, त्याचबरोबर मान तालुक्यांमध्ये वाळूचे ट्रक हे वडूज पोलिसांनी अडवले होते. वडूजमध्ये कारवाई केली होती. परंतु ती कारवाई माण तालुक्यात झाली नाही. परंतु, आता विभागीय पोलीस अधिकारीपदी निलेश देशमुख यांच्या नियुक्तीनंतर माण तालुक्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेबरोबरच सामान्य जनतेला योग्य न्याय मिळेल, अशी जनतेची भावना आहे. या ठिकाणी अनेक सक्षम अधिकारी होऊन गेले आज डॉक्टर निलेश देशमुख यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. दोन्ही अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य जनतेला कधी नव्हे एवढा आनंद झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे दोन्ही अधिकारी सर्वसामान्य जनतेला योग्य तो न्याय मिळवून देतील असे येथील स्थानिकांना वाटू लागले आहे.











Leave a Reply