“मराठा साम्राज्याचे राजे उदया नवी मुंबई मध्ये मराठा समाजाची माथाडी भवन येथे राज्यस्तरीय बैठक….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 मुंबई : नवी मुंबईमध्ये 7 तारखेला मराठा समाजाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. (Maratha reservation meeting will held on Wednesday Presence of Sambhajiraje And Udyanraje)

पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत आहे. तुर्भेतल्या माथाडी भवनात ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता माथाडी भवनात ही बैठक पार पडणार आहे.

मराठा संघटनांच्या सर्व संघटना, प्रतिनिधींना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा नेमकी काय असावी याबाबतीत या बैठकीत चर्चा होणार आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

तत्पूर्वी मराठा आरक्षणाच्या लढ्यात ठराविक वकिलांवर भर देण्यात येऊ नये, मराठा वकिलांची फौज या लढ्यात असली पाहिजे, वकिलांनी यामध्ये  पुढाकार घ्यावा, असं मत संभाजीराजे यांनी मांडलंय.

संभाजीराजे यांनी मराठा समाजाला EWS मधून आरक्षण नको, अशी भूमिका याअगोदर जाहीर केलीये. EWS आरक्षणाचे समर्थन करणारे पुढे काही धोका झाल्यास जबाबदारी घेणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

दुसरीकडे 3 ऑक्टोबर रोजी आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात विचार मंथन बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे दोघांनीही दांडी मारली होती. मुळे मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मेटेंना बैठक उरकावी लागली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *