Live Maharashtra24 : कराड तालुक्यातील दुशेरे येथील सेवानिवृत्त शिक्षिका शालन शिवाजीराव जाधव (वय ७४) यांचे अल्पशाआजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक डॉक्टर मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दैनिक तरुण भारतचे पत्रकार विजय जाधव व कृष्णा बँकेचे अधिकारी अजय जाधव यांच्या त्या मातोश्री, तर कृष्णा सहकारी बँकेचेमाजी अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या त्या पत्नी होत.
शालन जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या खुबी, कार्वे, शेणोली स्टेशन येथील शाळेत शिक्षिका व शेणोली मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिकाम्हणून उत्कृष्ट काम केले होते.
त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सर्व धार्मिक विधी घरगुती पद्धतीने होणार आहेत.












Leave a Reply