“आरक्षणाचा प्रश्न संभाजीराजे आणि उदयनराजेंनी सोडवावा, मी फक्त सात बाराचा गुंता सोडवण्यासाठी “भाजप ची टीका’

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुंबई : राज्यात सद्या आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज नाराज असून राज्यभरात आक्रमक आंदोलन करत आहे. मराठा समाजासोबत अनेक लोकप्राधिनिधी देखील उभे राहिले असून प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे व खासदार उदयनराजे हे देखील प्रामुख्याने मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, काही लोक या दोन वशजांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचे वातावरण निर्माण केले जात होते. त्यांना संभाजीराजेंनी चांगलेच फटकारले होते.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजीराजे आणि उदयनराजे यांना केंद्राकडून प्रश्न सोडून घ्यावा असा सल्ला दिला होता. पंढरपूरमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, “या दोघांनीच या लढ्याचे नेतृत्व करावे. हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. तेव्हा त्यांनी भाजपाकडून या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.”

अवधूत वाघांचा शरद पवारांना टोला

शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे पदाधिकारी अवधूत वाघ यांनी एक ट्विट करून अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली आहे. “मराठा आरक्षणाचा प्रश्न श्री संभाजी राजे व श्री उदयन राजे यांनी सोडवावा.. बाकी मी फक्त सात बाराचा गुंता सोडवण्यासाठी आहे.”असा घणाघात त्यांनी केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *