मुंबई: हाथरस प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सरकार अडचणीत आले आहे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल करत असल्याचे चित्र आहे.कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी योगींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला होता.
दरम्यान, आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे.जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर बदनापूरला आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हाथरस प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं.
रोह्याला चौदा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीला दरीत फेकून देण्यात आले. पुण्यात एका तरुणीला डोंगरात नेऊन दगडाने ठेचून मारण्यात आले. त्यावेळी राज्य सरकार झोपले होते का?असा थेट सवाल उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे
दरेकर पुढे म्हणाले, क्वॉरंटाइन सेंटरमध्ये बलात्कार होत आहेत त्यावर चकार शब्द काढला जात नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. महाराष्ट्रात अराजकता माजली आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. त्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांपासून ते राऊतांपर्यंत कोणीच बोलायला तयार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.














Leave a Reply