मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना या दसरा मेळाव्याची सुरुवात मुंबईमध्ये करण्यात आली. यानंतर शिवसेनाप्रमुख दसऱ्याचं औचित्य साधून शिवसैनिकांना संबोधित करण्याला कधीच खंड पडला नाही. यंदा मात्र खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना शिवाजी पार्कवर पार पडणाऱ्या या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.
राजकीय समीकरण बदललं आणि २०१९ च्या विधानसभा निकालानंतरच्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने सत्तास्थापन केली. त्याच शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवा जोश निर्माण झाला. मात्र फेब्रुवाडीच्या मध्यानंतर कोरोनाचा शिरकाव देशात झाला आणि पुढे हा उद्रेक वाढतच गेला. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा घेणे हे मात्र शक्य होणार नाही असं स्पष्ट असल्याने शिवसैनिकांच्या उत्साहाचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. आजच्या सामना अग्रलेखातून दसरा मेळाव्यावर भाष्य करण्यात आलं आहे.














Leave a Reply