सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा खुलासा केला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला तीन महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने गंभीर आरोप करत रिया चक्रवर्तीचे शिवसेनेसोबत असलेल्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी केली आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रियावर सुशांतच्या कुटुंबियांनी अनेक आरोप केले आहेत. तसेच सुशांत प्रकरणात शिवसेनेचा एक नेता सामील असल्याचे सुद्धा बोलले जात होते. अशातच आता झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा खुलासा केला आहे.














Leave a Reply