*आनंदवार्ता! सातारा-लोणंद मार्गासाठी तब्बल 23 कोटींचा निधी मंजूर, प्रवास होणार सुखकर!*
*अखेर वडूथ पंचक्रोशीकरांच्या आंदोलनाला यश*
*लाईव्ह महाराष्ट्र 24 । सातारा । विशेष प्रतिनिधी ।*
देशाच्या विकासात रस्तेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चांगले रस्ते असल्यास वेगाने दळणवळण होते. यामुळे चांगले रस्ते नेहमीच विकासात हातभार लावतात. अशाच प्रकारे सध्या केंद्र शासनाने अनेक राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन कामे सुरू केली आहेत. सातारा जिल्ह्यातूनही अनेक राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. पुणे-बेंगलोर या चार क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर यापूर्वीच आशियाई महामार्ग 47 म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच आता शासनाकडून सातारा-लोणंद मार्गालाही भरघोस निधी मिळाला असून काम लवकर सुरू होणार आहे. शासनाने या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी 23 कोटी 75 लाख रुपयांची निविदा निश्चित केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असणारा सातारा-लोणंद रस्ता मजबूत होत असताना आता या रस्त्यावरील अवजड वाहतुकीवर देखील नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. अन्यथा हा रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो. सातारा-लोणंद या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते, मदन सबळे तसेच किशोर शिंदे सरपंच वडूथ व स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठविल्यामुळे आता वाहनधारक व शेतकर्यांची परवड आता थांबणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न सुटणार असल्याने या मार्गावरचा प्रवास आता सुखकर होणार आहे.
सातारा-लोणंद राज्यमार्ग चौपदरीकरणाला वेळ लागणार असल्याने सध्या असणारा रस्ता मजबूत करण्यासाठी लातूरच्या यश कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाची निविदा निश्चित झाली आहे. सातारा-लोणंद या एकूण 44 किलोमीटर अंतरातील पहिल्या टप्प्यात सातारा ते वाठार स्टेशन या 26 किलोमीटरचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामात रुंदीकरण न करता असणारा रस्ता मजबूत करण्यात येणार आहे. या रस्ताच्या कामाची पहिली निविदा 24 मार्च 2020 रोजी काढण्यात आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे.
या मार्गावरील असणार्या सर्व ऐतिहासिक पुलांची देखील डागडुजी केली जाणार आहे. मात्र, सुरुवातीला 26 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम हाती घेण्यात येणार आहे. गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असणारा हा रस्ता मजबूत होत असताना आता या रस्त्यावरील अवजड वाहतुकीवर देखील नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. अन्यथा हा रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो. सातारा-लोणंद या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदन साबळे यांनी योग्यवेळी कार्यतत्परता दाखवल्याने वाहनधारक व शेतकर्यांची परवड आता थांबणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनच प्रश्न सुटणार असल्याने या मार्गावरचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या मार्गाला गेल्या कित्येक दिवसांपासून खड्ड्यांनी ग्रासले होते. याबाबत स्थानिकांनी वेळोवेळी आवाजही उठवला होता. अखेर त्यास यश आल्यामुळे वडूथ वासियांमध्ये आनंदाचे वातावरण संचारले आहे.
प्रतिक्रिया
या रस्त्याला कुठल्याही लोकप्रतिनिधींनी मदत केली नाही. खासदार उदयनराजे भोसले वगळता बाकी कोणीही या रस्त्याकडे बघायला सुद्धा आला नाही. या रस्त्यासाठी जर कोणीही मोलाचे सहकार्य केले असेल तर वडूथ येथील ग्रामस्थांनी. तरीही आम्ही कधीही कामाचे श्रेय घेत नाही. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपले पूर्वज निष्ठेने लढले परंतु, आम्ही एक डोक्यात विचार घेतला आहे वैयक्तिक मी तरी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणाचे बलीदान दिलेले आहे. परंतु, आता आपल्या देशासाठी काहीतरी चांगले करता येईल, ही भावना आमच्या डोक्यात आहे. त्यामुळे या भागातील लोकांची कायमच कुठलीही अडचण असू द्या तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.
*-मदन साबळे,*
अध्यक्ष छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा,
जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा (भारत)












Leave a Reply