पार्थ पवार यांनी घेतली पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात भूमिका?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पार्थ पवार यांनी घेतली पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात भूमिका?

मराठा आरक्षण लागू न केल्यामुळे अनेक पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे. आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागे होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवे असे सूचित केले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन छत्रपती राजे खासदारांनी केंद्र सरकारकडून आरक्षण मिळवून द्यावेत असा व्यक्त केले होते मात्र पार्थ पवार यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घ्यावी असे व्यक्तव्य केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला असलेल्या स्थगिती मुळे एका युवकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे पार्थ पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.” विवेक सारखी तरुण मुले आत्महत्या करत आहेत मराठा समाजातील नेत्यांनी आता तरी जागृत झाले पाहिजे” अशा आशयाचं पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोट दाखवत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे या आधी राम मंदिर जय श्रीराम नारा देताना पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शरद पवार यांनी टीका केली होती,  राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांचा जीव गमवावा लागू शकतो असे फार त्यांनी म्हटले आहे जय हिंद,  जय महाराष्ट्र असा नारा देत पार्थथ पवार यांनी सरकारला एक प्रकारचा इशारा दिला आहे असे दिसून येते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *