
राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली ऑक्टोबर महिन्याची तारीख; रस्त्यावरून दुप्पट क्षमतेची वाहने करताहेत ये–जा, रस्त्याची कमालीचीदुरवस्था
राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिली ऑ्नटोबर महिन्याची तारीख; रस्त्यावरून दुप्पट क्षमतेची वाहने करताहेत ये–जा, रस्त्याची कमालीचीदुरवस्था
*सातारा लोणंद महामार्गाकडे प्रशासनाचे अद्यापही दुर्लक्ष!*
*ऐतिहासिक महामार्गाचे पूल कोसळल्यास गावाला 20-25 किलोमीटरच्या बाह्यवळणाचा बसणार फटका*
लाईव्ह महाराष्ट्र 24।
सातारा । विशेष प्रतिनिधी ।
सातारा–लोणंद रस्त्याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून रस्त्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उदयनराजे मित्र मंडळ, वडूथ सातारचे अध्यक्ष मदन भिमाजीसाबळे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून आंदोलने केली जात आहेत. मात्र रस्ता आंदोलन झाल्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे कामकरण्यात आले. दरवर्षी पावसाळा आला की या रस्त्यांची पुन्हा तीच अवस्था होते. सातारा–लोणंद रस्त्यावर ऐतिहासिक महामार्ग आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या महामार्गावरून अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक करतात. त्यामुळे या रस्त्याची वारंवारदुरवस्था होते. परिणामी येथील या रस्त्यावरील वाहतूक पावसाळ्यापूर्वी बंद करावी. तसेच ही वाहतूक वळवून लोणंद मार्गे सातारा अशीकरावी, अशी मागणी मदन साबळे यांनी केली आहे. येथील ग्रामस्थ वेळोवेळी आपल्या मागण्या प्रशासनाकडे मांडत असतात. मात्रप्रशासनाचे सातारा–लोणंद महामार्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागानेही या रस्त्याच्यादुरुस्तीसाठी ऑ्नटोबर महिन्याची मुदत येथील ग्रामस्थांना दिली आहे. मात्र ऑ्नटोबर महिना उजाडायच्या आतच या रस्त्यावरीलऐतिहासिक पूल कोसळण्याची भीती व्य्नत केली जात आहे. या गावातील ऐतिहासिक महामार्गावरील पूल पडल्यास वाहनधारकांनाकमीत–कमी दोन ते तीन वर्ष बाह्यवळण मार्गाचा फटका बसण्याची श्नयता नाकारता येत नाही.
ही बाह्यवळणे वीस–पंचवीस किलोमीटर अंतराची असल्याकारणाने येथील नागरिकांना वृद्ध महिलांना याचा त्रास सहन करावा लागेल.
हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. मात्र आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सातारा–लोणंद रस्त्याची ये–जा करण्याची वाहतूक क्षमता पंधरा ते वीस मेट्रिक टन आहे.
मात्र या रस्त्यावरुन 50 मॅट्रिक पेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्या वाहतूक करतात.
त्यामुळे याठिकाणी कितीही चांगल्या प्रतीचा रोड केला तरीही तो रस्ता पुन्हा पावसात खराब होतो.
नॅशनल हायवे क्रमांक 117 च्या अधिकार्यांना येथील नागरीकांनी सूचना केली आहे की, त्वरित अवजड वाहतूक बंद करा व तुमचे कामसुरू करा त्यामुळे कोणालाही कामात अडथळा येणार नाही किंवा जनतेला त्रास होणार नाही.












Leave a Reply