मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात कधीही न पाहिलेला सत्तासंघर्ष दिसून आला. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली होती.
या सर्व घडामोडीत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती.
दरम्यान, आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली
ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नाही. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता, सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल संजय राऊतांनी भाजपावर आरोप केले होते.













Leave a Reply