खटाव तालुक्यामध्ये मानव अधिकाराचा बुरखा पांघरून फिरणाऱ्या संशयित दरोडेखोर अतुल पवार राहणार (उंबर्डे ) यांच्या बरोबर निलेश जाधव सचिन जाधव राहणार( वडूज तालुका खटाव )सोमनाथ साठे राहणार( सिद्धेश्वर कुरवली) यांच्या टोळीला आज पोलीस स्टेशन ने ताब्यात घेतले माहिती अशी की विकत घेतल्या डंपर चे पैसे न देता मालकाकडून खंडणी वसूल करून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी यांना अटक करण्यात आले आहे त्याची माहिती शनिवारी पहाटे खटाव तालुक्यात वार्यासारखी पसरल्यानं तर नागरिकांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला प्रदीप चंद्रकांत शिंदे राहणार चिंचाळे तालुका आटपाडी यांनी ठाण्यात तक्रार दिली याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की शिंदे यांनी 2016 साली शेती कामासाठी डंपर विकत घेतला होता डंपर 2020 साली गणेश सातपुते राहणार वडूज यांना व गणेश सातपुते राहणार वडूज यांना सातपुते आणि शिंदे यांच्यात नोटरी करार झाला होता त्यावेळी तो डंपर 14 लाख 55 हजार रुपये ला खरेदी केला होता त्या मधील 4लाख 65 हजार कर्जापोटी विटा येथे श्रीराम फायनान्स मध्ये भरले होते बाकीचे पैसे एका महिन्यानंतर देण्याचे ठरले होते एका महिन्यानंतर शिंदे याने सातपुते यांच्याकडे पैशाची मागणी केली असता डंपर ला काम नसल्यामुळे पैसे देण्याची टाळाटाळ केली त्यानुसार शिंदे आणि आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केला
तक्रारीनुसार सातपुते आणि अतुल पवार
यांनी शिंदे यांना धमकी दिली गणेश यांच्यावरती का तक्रार केली याबद्दल जाब विचारला तुझे पैसे पाहिजे असेल तर आम्हाला 50 हजार रुपये तर तुझ्या सर्व पैसे मी देतो अन्यथा तुझे पैसे मी देणार नाही त्यानुसार शिंदेे यांनी मित्राकडून उसने दहा हजार रुपये घेऊन अतुल पवार यांना दिले त्यानुसार राहिलेले 40 हजार रुपये आठ दिवसानंतर देतो असे शिंदे यांनी अतुल पवार यांना सांगितले त्यानंतर आठ दिवसांनी शिंदे सातपुते यांना पैसे मागण्यासाठी आल्यानंतर अतुल पवार यांनी शिंदे यांच्याकडे राहिलेल्या 40 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली त्याचबरोबर अतुल पवार यांनी शिंदे यांना धमकी देऊन मी कोण आहे तुला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविल अशीच धमकी दिली व अतुल पवार यांच्याबरोबर असणारा निलेश जाधव यांनी शिंदे यांच्या कानाखाली मारून त्यांना पुन्हा वडूज मध्ये पैसे मागण्यासाठी यायचं नाही अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी दिली त्यानंतर शिंदे घाबरून आपल्या गावी निघून गेले त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा पैसे मागण्यासाठी वडूज ला आले असता शिंदे यांनी सातपुते यांना फोन लावला व मी वडूज येथे एसटी स्टँड समोर आला आहेत माझे पैसे मला दे असे सांगितले त्यानंतर काही वेळातच क***** फॉर्च्यूनर मधून अतुल पवार निलेश जाधव सोमनाथ साठे आणि सचिन जाधव यांनी गोलाकार कडे करून शिंदे यांना धमकावणा-या सुरुवात केली तू आमचे चाळीस हजार रुपये कधी देणार आहेत असे सांगून त्यांच्या खिशातून तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले वडूज ला पुन्हा पैसे मागण्यासाठी आला तर मारून टाकीन अशी धमकी दिली असे शिंदे आणि फिर्यादी मध्ये लेखी दिली आहे याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पारेकर करत आहेत











Leave a Reply