मुंबई/अहमदनगर: राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एक दिवसभर अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्यावेळी शरद पवार यांनी अन्नत्याग केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते, अशी टीका भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरुन गोंधळ सुरु आहे. या कृषीविधेयकावरुनही विनोद तावडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार साहेब स्वतः कृषिमंत्री होते. शरद पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, असं विनोद तावडे यांनी सांगितले.
“मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर शरद पवारांनी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते “














Leave a Reply