मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यासह देशातील अनेक लोकप्राधिनिधींसह, केंद्रीय मंत्री व बॉलिवूड स्टार्स देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातच आता, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे.
काल, त्यांनी कोव्हिड चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केले असून इतरांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी, ” काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…” असे ट्विट केले आहे.













Leave a Reply