मराठा समाज म्हणतो आजही आमची फसवणूक!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

EWS चे लाभ.., ही मराठा समाजाची फसवणूक

मराठा आरक्षणास संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २५ वर्ष मराठा अभ्यासक व हितचिंतकांनी आरक्षण मिळावे म्हणून कष्ट घेतले आहेत. आज आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
मराठा समाजाला EWS फायदे लागू होतील हा जीआर काढणे म्हणजे मराठा समाजाची निव्वळ फसवणूक आहे. कारण आरक्षणास स्थगिती मिळाली त्यावेळेपासून मराठा EWS वर्गात गेलेला आहे.

सरकारने घटनादुरुस्ती प्रस्ताव माडण्यासाठी प्रयत्न करावेत. तोपर्यंत सर्व नोकरभरती बंद करावी. मराठा आरक्षणाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करू नये. मंत्रिमंडळ बैठक दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ,डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ,डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत,
मराठा मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेऊ, मराठा मोर्चामधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ. या जुन्या मागण्या १ वर्षापासून सरकार पुन्हा नव्याने पुढे करत आहे.

हे पोकळ निर्णय म्हणजे सरकार आरक्षण स्थगिती उठविण्याबाबत गंभीर नाही. मराठा समाजाला आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील आरक्षण नको आहे. EWS आरक्षण ओपनमधील गरीब लोकांसाठी आहे. त्यांच्या १० टक्के मध्ये मराठा समाज वाटेकरी करू नका. आमचे स्वतंत्र आरक्षण द्या. मराठा समाज कोणत्याही समाजाचे फायदे लाटून इच्छित नाही. जे हक्काचे आहे ते द्या.

मराठा सरकारी पोकळ घोषणेमुळे फसवणूक करून घेणार नाही. अधिकारी वर्गाने जाणिवपूर्वक सारथी संस्था कमजोर बनवली आहे. सुमारे ८ महिन्यापासून विद्यार्थीना मानधन नाही. सर्व योजना बंद केल्या आहेत. बार्टी मात्र जोरात सुरू आहे. बार्टीमधील घोटाळा उघड होऊनही कोणत्याही आधिकाऱ्यावर गुन्हे दाखल नाहीत किंवा निधी बंद नाही. केवळ सारथी संस्थाचा निधी कोणत्याही घोटाळा नसताना बंद कसा झाला. यामागे मोठे षडयंत्र आहे.

त्यामुळे २२ सप्टेंबर रोजीचा निर्णय म्हणजे फक्त घोषणा आहे. याचे फायदे मराठा समाजाला होणार नाहीत. मंत्रालयातील अधिकारी ते होऊनही देणार नाहीत. बार्टी व सारथी संस्थांची तुलना केली तर हे कारस्थान उघड होते. बार्टी संस्थेने कोरोना काळात संशोधन शिष्यवृत्तीची परीक्षा न घेता सरसकट लागू केली आहे परंतु सारथीकडे संशोधन शिष्यवृत्तीचे अर्ज ७ महिन्यापासून पडून आहेत. तरी कोणताही निर्णय नाही.

आज मराठा तरूणांची हेळसांड होत आहे. रोज नवीन तरतूदी मराठा तरूणांना मान्य नाहीत. १३ टक्के आरक्षण सवलती पुन्हा लागू करा. तसेच आरक्षण स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती, स्पर्धा परीक्षा पुढे ढकला. मराठा समाजाच्या हक्काच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवा. तरूणांची हेळसांड बंद करा. मराठा समाजाने फक्त रोज एक नवीन सर्टिफिकेट काढण्यात आयुष्य घालवायचे का? याचा विचार करा. सारथीच्या सर्व योजना बार्टी धरतीवर लागू करा.
मराठा आरक्षण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *