माण मध्ये मुदत संपलेल्या काही ग्रामपंचायतीचे कारभार…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ग्रामपंचायतींचा कारभार रामभरोसे

दहिवडी: माण तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार  रामभरोसे सुरू असुन ना प्रशासकांचे लक्ष आहे ना ग्रामसचिवांचे त्यामुळे नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे हा खरा प्रश्न आहे. आज कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहेत अश्यात अनेक ग्रामसचिव हे गावात हजार राहत नाहीत जर गावकऱ्यांनी विचारले तर अनेक वेळा वेगळी उत्तरे मिळतात एक ग्रामसचिवाला दोन किंवा तीन गावे दिली आहेत हे ग्रामसचिव कोणत्याच गावात उपलब्ध नसतात परंतु लोकांना सांगताना मी दुसऱ्या गावात कामावर होतो असे सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात माहिती घेतली असता अनेक वेळा त्या गावात ग्रामसचिव हजर नसतात त्या मुळे केंद्रसरकरने पंचायत राज्यांना इतके अधिकार दिले आहेत परंतु त्याची पायमल्ली या तालुक्यामध्ये होत असून अनेक गावातील लोकांनी ग्रामविकास सचिव यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत तरी तालुका प्रशासनाने माण मध्ये ग्रामसचिव व त्या ठिकाणी नेमलेल्या प्रशासकाच्या कामाची दरदिवशी हजेरी घ्यावा त्या शिवाय जनतेला न्याय मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *