मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा जो सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले’ अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकार पाडण्यात काही अधिकारी सामील असण्याच्या पसरलेल्या वृत्तावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिल असून शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील सामील होते. ते पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.निलेश राणे यांनी, ” शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला. ” असा घणाघात देखील ट्वीटद्वारे केला आहे.
Nilesh N Rane@meNeeleshNRaneशिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला.
शरद पवार यांचा गेम करणारे अजित पवार होते!















Leave a Reply