पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता, असा धक्कादायक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केल्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. खुद्द गृहमंत्र्यांनी असे विधान केल्याननंतर आता अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी स्पष्ट केले.
मात्र यानंतर ‘राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं काहीही मी बोललेलो नाही. याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे,’ माझ्या तोंडी चुकीचे वक्तव्य घालण्यात आले आहे. असा खुलासा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला.














Leave a Reply