सातारा–लोणंद रस्त्यावर विना अपघातासाठी होणार उपाययोजना – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

सातारा : प्रतिनिधी

सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डी वर सातत्याने वाढते अपघात चिंताजनक बाब आहे. या रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात  दि.२२ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत सातारा तालुक्यातील वाढे, वडूथ, आरळे, शिवथर आदी गावांमधून जाणारा महामार्ग दाट लोकवस्तीमधून जात असून या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत. वारंवार अपघाताने अनेकांना जीव गमावला लागला असल्याचे गंभीर मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला. करण्यात आला.

यावर मंत्री महोदयांनी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता या मार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. याची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. तर गावांमधून जाणारे रस्ते बायपास करणे, रस्त्यांची सुधारणा, धोकादायक वळणांवर सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक, रस्त्याचे रुंदीकरण तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ठोस नियोजन आणि उपाय तातडीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील विविध पुलांची प्रलंबित कामे, रस्त्यांची सद्यस्थिती तसेच भविष्यातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी कदम यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे, किरण साबळे पाटील (नाना), राहुल शिंदे, राजेंद्र नलावडे, साईराज कदम, जितेंद्र कदम, अभिजीत साबळे पाटील, धीरज नलावडे, विनय कदम, महेंद्र कदम यांच्यासह खेड, वाढे, पाठकळ, आरळे, वडूथ, आरफळ, शिवथर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *