वडूथ–जरंडेश्वर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात; प्रशासनाकडून दखल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :

वडूथ ते जरंडेश्वर रेल्वे स्टेशनदरम्यानचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावेलागत होते. या रस्त्याच्या खराब स्थितीबाबत यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीची तसेच भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सचिव मदनभिमाजी साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या लेखी मागणीची अखेर प्रशासनाने दखल घेतली असून रस्त्याच्यादुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

या मार्गावर मोठे खड्डे, तुटलेले कडे आणि उडणारे दगड यामुळे दुचाकीस्वार, वाहनचालक, विद्यार्थी पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊनप्रवास करावा लागत होता. वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी माध्यमांतून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर मदन साबळे यांनी सार्वजनिकबांधकाम विभागाला निवेदन देत तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्यानंतर संबंधित विभागानेहालचाली करत रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे.

दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी कामगार या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे सुरू असलेले काम दर्जेदार टिकाऊ असावे, तसेच वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशी अपेक्षा मदन साबळे यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नयेयासाठी संपूर्ण रस्त्याची गुणवत्ता तपासून काम करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे सातत्यानेलक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *