सातारा–लोणंद रस्ता : वडूथ येथील कृष्णा नदी पुलावर ट्रक बंद पडल्याने तीन तास वाहतूक कोंडी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारालोणंद मार्गावरील (राज्य मार्ग क्र. ९६५डी) वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलावर काल दिं १८ रोजी सायंकाळी सुमारे वाजण्याच्यासुमारास एक अवजड ट्रक अचानक बंद पडला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही वेळातचवाहनांच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या.

या घटनेची माहिती पत्रकार निलेश रासाळ यांनी दूरध्वनीद्वारे सातारा जिल्हा सचिव, भाजपा युवा मोर्चा, मदन साबळे यांना दिली. पुलावर तीव्र वाहतूक कोंडी झाल्याचे कळताच मदन साबळे अमित साबळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी धोरपडेवाहतूक ठाण्याचे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यांनी वाहतूक वळवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाचीमदत केली.

मदन साबळे अमित साबळे यांनी ट्रक चालकाची भेट घेऊन त्याच्याशी शांतपणे चर्चा केली. चालकाने मदतीची विनंती केल्यानंतरगावातील तुकाराम (तुका नाना) यांना घटनास्थळी आणण्यात आले. सर्वांनी मिळून प्रयत्न करून ट्रकमधील तांत्रिक अडचण दूर केलीआणि ट्रक पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले.

सुमारे तीन तासांनंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे समन्वयामुळे केवळ पाच मिनिटांतअडकलेली वाहने हळूहळू पुढे सरकू लागली आणि अखेर मार्ग पूर्णपणे मोकळा झाला.

या घटनेमुळे सातारालोणंदसारख्या महत्त्वाच्या मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपाययोजना वाहतूक व्यवस्थापन कितीआवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *