बेजबाबदार वागाल तर कंपनीवर कठोर कारवाई — मदन साबळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :

सातारालोणंद मार्गावरील वडुथआरळे येथे कृष्णा नदीवरील पुलाच्या कामात KCPL कंपनीकडून झालेल्या जाणीवपूर्वकनिष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. ही परिस्थितीमनुष्यहत्यासदृशनिष्काळजीपणातमोडते, अशी ठोस तक्रार भाजप युवा मोर्चाचे सातारा जिल्हासचिव श्री. मदन भिमाजी साबळे यांनी संबंधित विभागांकडे केली होती.

या तक्रारीसोबतच त्यांनीसातारालोणंद मार्गावरील सर्व देखभालकामे तातडीने, दर्जेदाररित्या आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडावीतअशी मागणीही केली. तसेच, ज्या कोणत्या ठिकाणी अपघातासारख्या गंभीर समस्या आढळतात त्या ठिकाणांची माहितीग्रामपंचायतींमार्फत गोळा करून संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय ठेवत त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्टपणेसांगितले.

या प्रकरणी  लाईव्ह महाराष्ट्र २४ न्यूज’, ‘लोकवृत्तन्यूजची सातत्यपूर्ण बातमी, श्री. मदन साबळे यांचा मजबूत पाठपुरावा आणि NHAI अधिकारी कदम सर यांची तत्परता निर्णायक ठरली. कदम सर यांनी तात्काळ आदेश देत पुलासह संपूर्ण मार्गावरील दुरुस्तीला वेगदिला आणि मानकांनुसार काम करण्याचे निर्देश कंपनीला दिले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक तांबे सर यांनीही तातडीने NHAI अधिकाऱ्यांशी समन्वय साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास महत्त्वपूर्णमदत केली. ‘अजिंक्य न्यूजचे सुनील साबळे यांनीही मुद्दा सार्वजनिक पातळीवर प्रभावीपणे मांडून कामाला गती मिळवून दिली.

KCPL कंपनीच्या इंचार्जच्या मते, “गेल्या तीन दिवसांपासून प्लांट बंद असल्याने काम थांबले होते. जड वाहतुकीमुळे प्रत्यक्ष कामातअडचणी येत होत्या. शिवथर परिसरातील अपघातामुळे वातावरण आणखी गंभीर झाले.”

या अपघातात एका तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

यावेळी श्री. मदन साबळे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “दुरुस्तीचे काम आणि जड वाहतूक एकत्र सुरू असल्याने वाहनचालकांनीसावधगिरी बाळगावी, वेग कमी ठेवावा आणि नियमांचे पालन करावे. सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

तसेच त्यांनी सांगितले की, “सातारालोणंद मार्गावर कोणताही निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये, यासाठी सतत देखरेख ठेवली जाणारआहे. ग्रामपंचायती, नागरिक आणि विभागीय अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपूर्ण मार्ग सुरक्षित सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्नसुरू राहतील.”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *