वडूथ–जरंडेश्वर रस्ता दोन वर्षांपासून जीर्ण; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :
वडूथ–जरंडेश्वर रस्ता दोन वर्षांपासून जीर्ण; नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन भिमाजी साबळे यांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी

वडूथ ते जरंडेश्वर रेल्वे स्टेशनदरम्यानचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत असून खड्डे, तुटलेले कडे आणि उडणारे दगड यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर वारंवार अपघात घडत असून प्रवास धोकादायक झाला आहे.

दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि कामगार या मार्गाचा वापर करतात. मात्र सातत्याने तक्रारी करूनही दर्जेदार दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सुरू असलेल्या कामातील गुणवत्तेबाबतही मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सचिव मदन भिमाजी साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. रस्त्याची सद्यस्थिती जीविताला धोका पोहोचवणारी असून तातडीने उच्च दर्जाचे काम हवे, अशी त्यांची भूमिका आहे.

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *