वडुथ–आरळे पुलप्रकरणी तात्काळ कारवाई: मदन साबळे यांचा पाठपुरावा आणि NHAI कदम साहेबांच्या हस्तक्षेपामुळे काम मार्गी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा –

सातारालोणंद मार्गावरील वडुथआरळे येथे कृष्णा नदीवरील पुलाच्या कामात KCPL कंपनीकडून झालेल्या जाणीवपूर्वकनिष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. ही परिस्थितीमनुष्यहत्यासदृशनिष्काळजीपणातमोडते, अशी ठोस तक्रार आणि मागणी भाजप युवा मोर्चाचे सातारा जिल्हासचिव श्री. मदन भिमाजी साबळे यांनी संबंधित विभागांकडेकेली होती.

या प्रकरणी  सातत्यपूर्ण बातम्या, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हासचिव श्री. मदन साबळे यांचा अखंड पाठपुरावा आणि सर्वातमहत्त्वाचे म्हणजे NHAI अधिकारी कदम साहेब यांनी दाखविलेली तत्परता निर्णायक ठरली. कदम साहेबांनी तात्काळ आदेश देत सर्वआवश्यक दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेचपुलाचे काम पुन्हा योग्य पद्धतीने, सुरक्षित मानकांनुसार आणिदर्जेदाररित्या करून घ्यावे,” अशी स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कंपनीला दिली.

कदम साहेबांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे तातडीचा धोका दूर झाला असून पुलावरील कामाला नव्याने गती मिळाली आहे.

याप्रसंगी श्री. मदन साबळे यांनी कदम साहेबांचे विशेष आभार मानत सांगितले की, “भविष्यात सातारालोणंद रस्त्यावर कोणताहीनिष्काळजीपणा होऊ नये म्हणून आम्ही नियमित वॉच ठेवणार आहोत. आपल्या मार्गदर्शनातून पुढेही चांगले, सुरक्षित आणि नियमबद्धकाम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *