केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे ‘अविष्कार’ स्पर्धेत नेत्रदीपक यश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा (प्रतिनिधी):

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा किसनवीर महाविद्यालय, वाई येथे मंगळवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च स्टडीज, सातारा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटविला आहे.

स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले —

1️⃣ तन्वी जगताप – प्रथम क्रमांक

2️⃣ मंगेश कुशवाह – प्रथम क्रमांक

3️⃣ तेजस शेळके – चतुर्थ क्रमांक

4️⃣ मोहम्मद युनूस बागवान – चतुर्थ क्रमांक

5️⃣ धनराज तपासे – पाचवा क्रमांक

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची निवड आता शिवाजी विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेसाठी झाली असून, तेथे ते सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राध्यापक डॉ. सारंग भोला आणि सहाय्यक प्राध्यापिका तेजश्री शेवते यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे संचालक डॉ. बापूसाहेब सावंत, प्रो. डॉ. आर. डी. कुंभार, डॉ. निकम, डॉ. चव्हाण यांसह सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी विद्यार्थ्यांना मोठे प्रोत्साहन दिले.

रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी (IAS, निवृत्त) आणि सचिव मा. विकास देशमुख (IAS, निवृत्त) यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *