वडूथ येथील तेजोमोय दिपोत्सव स्थगित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा -प्रतिनिधी

वडूथ (ता. सातारा) येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या ऐतिहासिक श्री शकुंतलेश्वर मंदिराच्या सभोवती दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघतो. ‘दीपोत्सव’ हा वडूथ गावाचा साज, श्रद्धा आणि संस्कृतीचा संगम ठरला आहे.


सन २०१२ पासून वडूथच्या खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रमंडळ हा दीपोत्सव आयोजित करतो. यात गावातील प्रत्येकाचा स्वयंस्फूर्तीने सहभाग हीच उत्सवाची खरी ओळख ठरला आहे.

मात्र, महाराष्ट्रातील पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि गावातील काही दुःखद घटनांचा विचार करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवत हा दीपोत्सव स्थगित करण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला आहे.

मुख्य आयोजक मदन साबळे यांनी, “हजारो पणत्या विझल्या असल्या, तरी समाजाप्रती आपली संवेदनशीलता हा सर्वात मोठा प्रकाश आहे. दु:खाच्या काळात आनंद क्षणभर बाजूला ठेवणंही हीच खरी दिवाळी असून पुढील वर्षी आणखी दिमाखात व आनंदात दीपोत्सव साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *