परळी :
छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय रघुवीर समर्थ.. अशा प्रेरणादायी घोषणा देत एन.सी.सी कॅडेट्स नी किल्ले सज्जनगडावर स्वच्छतेचा जागर केला.
गड किल्ले म्हणजे आपली अस्मिता आपले वैभव.. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी या गडकिल्ल्यांच्या जोरावर गनिमांना आस्मान दाखवले.
अशा या गड पवित्र किल्ल्यांचे संवर्धन व्हावे पावित्र्य राखले जावे या उद्देशाने साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तसेच धनंजय राव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले सज्जनगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधी समोर श्रीफळ वाढवून कामास शुभारंभ करण्यात आला.
एन.सी.सी कॅडेटच्या विद्यार्थिनींनी क्लाइंबिंग रोप ला धरून महाद्वारा वरील झाडाझुडपांची स्वच्छता केली.
तसेच सज्जनगड बस स्थानक पायरी मार्ग, अंगलाई अंगलाई देवी मंदिर धाब्याचा मारुती या परिसरातील पावसाने वाढलेली झाडे झुडपे प्लास्टिकचा कचरा संघटित करून त्याची विल्हेवाट लावली परळी सज्जनगड मार्गावरील वाढलेली झाडे झुडपे ही छाटण्यात आली.
देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत पत्रकार सोमनाथ राऊत, कॅप्टन डॉ. राजशेखर निलोलू, लेफ्टनंट सुशांत पोळ लेफ्टनंट गणेश चोरगे, निवृत्त सुभेदार दीपक शिंदे दुर्गनाद प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धक आदी उपस्थित होते गडावरील समर्थ सेवा मंडळ यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यानंतर गडावरील वैशंपायन रामदासी यांनी सज्जनगड ची माहिती देत त्यांना छत्रपती शिवरायांचे कार्य समजावून सांगितले.
गडावरील स्वच्छते बद्दल योगेश व रामदासी, रामदास स्वामी संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले.












Leave a Reply