गोडोली -प्रतिनिधी
दि रयत सेवक बँकेची विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांना तब्बल ११ टक्के लाभांश जाहीर करून तत्काळ खात्यात जमा केला.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४० मध्ये स्थापन केलेली
महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या बँकांमधील उत्कृष्ट
दि रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बँक ओळखली जाते.
साताऱ्यात रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी
बॅंकेची विशेष सर्वसाधारण सभा चेअरमन नंदकिशोर गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. नंदकिशोर गायकवाड यांनी बँकच्या प्रगतीचा अहवाल सादर करत सभासदांसाठी अनेक हितावह निर्णय घेतल्याचे सांगितले. २०२४-२५ या वर्षात बँकेचे भाग भांडवल रु.७७.७३ कोटी, सभासद संख्या ९५२३ असून रु.१५९५.६३ कोटी ठेव संकलन, रु.१०४४.७४ कोटीचे कर्जवाटप, ढोबळ एन.पी.ए. ०.७९ टक्के , निव्वळ एन. पी. ए. शुन्य टक्के तर ऑडिट वर्ग ‘अ’ मिळविण्याची परंपरा बँकेने कायम राखलेली आहे. या आर्थिक वर्षामध्ये बँकेने रु. १४५० कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला असल्याचे सांगून बँकेने सर्व सभासदांना कर्जावरील व्याजात २ टक्के सूट (रिबेट) दिलेली आहे. बँकेस यावर्षी रु.१४.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्यामुळे सभासदांना ११.०० टक्के दराने लाभांश त्यांनी जाहीर केला.
सभेचे नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर कणसे यांनी केले. सभेस व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सभासद, बँक पदाधिकारी व सेवक उपस्थित होते.












Leave a Reply