वडुथ : भारत माता दुर्गा उत्सव मंडळ, वडुथ यांच्या वतीने दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी महातोबा मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात साताऱ्यातील अक्षय ब्लड बँक या संस्थेने रक्तसंकलन केले.
शिबिरात एकूण ६० रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे पुरुषांसोबत महिलांनीही उत्साहाने रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवला.
रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे दात्यांचा उत्साह आणखी वाढला.
मंडळाने २०२४ साली सामाजिक उपक्रमांची संकल्पना सुरू केली असून ती कायम ठेवण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे. धार्मिक उपक्रमांबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांनाही महत्त्व देत भविष्यातही अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आश्वासन मंडळाने दिले.
रक्तदान शिबिर यशस्वी केल्याबद्दल मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रक्तदात्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.












Leave a Reply