संघर्षामध्ये लढतो तोच खरा योद्धा-खासदार निलेश लंके (जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये एक दिलाने पाठीशी राहा)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा

“संघर्षामध्ये लढतो तोच खरा योद्धा असतो, आणि संघर्षात जो साथ देतो त्याचाही दिवस येतो!” – असे ठणकावून सांगत खासदार निलेश लंके यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कांदा आक्रोश मोर्चा दरम्यान त्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी सरकारच्या कानावर खडे बोल सुनावले.

जाती-जातीमध्ये भांडण न लावता विकासाबाबत बोला असे न करता राज्यामध्ये टोळी तयार केली आहे गावागावात जाऊन सत्ताधारी काहीही बोलतात आणि आश्वासने देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करतात. परंतु संघर्षामध्ये जो लढतो तोच खरा योद्धा हिटलरचा काळ थोडा होता आमचेही दिवस येतील. माणसातील देव आदरणीय शरद पवार आहेत अनेक लोकांना त्यांनी घडवलं या नेतृत्वावर विश्वास ठेवा. तसेच
कांद्याला दर मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलो, तरी सरकारचे डोळे अजूनही झाकलेले आहेत, अशी खरमरीत टीका निलेश लंके यांनी केली. “हे सरकार शेतकऱ्यांचे नाही, दलालांचे सरकार आहे,” असा आरोपही त्यांनी शिवथर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी केला.
त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सोसायटीचे चेअरमन बबनराव साबळे सरपंच प्रिया साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे छत्तीसगाव सरचिटणीस युवराज पवार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संजनाताई जगदाळे माजी झेडपी सदस्य अर्चनाताई देशमुख मेघा नलवडे माजी सरपंच रूपाली साबळे हेमलता साबळे नसीम इनामदार माजी उपसरपंच नवनाथ साबळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद साबळे माजी उपसरपंच दिलीप साबळे भानुदास साबळे विलासराव कदम अभिजीत साबळे रविभाऊ पवार नितीन जाधव उपसरपंच श्रीकांत पवार दीपक पवार विनायक कदम अतुल शिंदे संपतराव शिंदे विनायक बर्गे गिरीश फडतरे तसेच अठरा गावातील सरपंच उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
शशिकांत शिंदें म्हणाले- “18 गावांच्या विश्‍वासावर उभा राहिलो, शरद पवार साहेबांनी मला प्रदेशाध्यक्ष केलं जबाबदारी मोठी आहे परंतु सर्वसामान्य जनतेसाठी न्याय देण्याचं काम केलं जाईल. आपली भूमिका मांडताना भावनिक पण ठाम वक्तव्य केले. “सातारा तालुक्यातील 18 गावांच्या विश्वासावर मी उभा राहिलो होतो, आणि शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच माझी राजकीय उंची वाढली,” असे म्हणत त्यांनी पक्षप्रमुखांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. “एमपीएससी परीक्षार्थींना न्याय मिळत नाही, एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय सुरूच आहे, आणि सरकार फक्त निवडणुकीच्या तोंडावर जाहिराती करतंय, काम काहीच नाही,” असा घणाघात शिंदे यांनी केला.

“आमच्याच कार्यकर्त्यांवर चौकशा का?” – महायुतीवर सवाल

शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत विचारले, “आमचेच कार्यकर्ते जेव्हा महायुतीच्या विरोधात उभे राहतात, तेव्हा त्यांच्यावर चौकशा का सुरू होतात? हा दडपशाहीचा प्रकार नाही का?”

त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत मतदारांना आवाहन करत सांगितले की, “राजकारण बदलतंय, हिटलरचाही काळ गेला, आमचे दिवस देखील येतील – पण त्यासाठी सर्वांनी एकदिलाने पाठीशी उभं राहा.”

शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल नाहीच!

पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही सरकार पंचनामे करत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. “हे सरकार शेतकऱ्यांचा नाही, मतांचा हिशोब करतंय,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

युवकांसाठी नवा लढा – बेरोजगारीच्या विरोधात आंदोलनाची घोषणा

कार्यक्रमाच्या अखेरीस युवकांच्या बेरोजगारीच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करण्याची घोषणा केली गेली. “ही केवळ सुरुवात आहे – पुढे आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला जागं करू,” असा निर्धार आमदार शशिकांत शिंदे यांनी दर्शवला.

 

राज्य सरकारने जर वेळीच डोळे उघडले नाहीत, तर जनता आणि युवक रस्त्यावर उतरून त्यांना जागं करणारच, असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *