ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जागृकता निर्माण करणे ही खरी समाजसेवा – पो. नि. निलेश तांबे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षाया उपक्रमांतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च, सातारा क्विक हिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक निलेश तांबे (सातारा तालुका पोलीस) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ऑनलाईनफसवणुकीच्या पद्धती, त्यातील इशारे त्यापासून बचावाचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “ऑनलाईन फसवणूकटाळण्यासाठी समाजामध्ये जाऊन जागृकता निर्माण करणे हीच खरी समाजसेवा आहे.तसेच विद्यार्थ्यांनी सायबर वॉरियर म्हणूनघेतलेले पुढाकार कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात सायबर पोलीस वर्षा खोचे सीमा भुजबळ यांनी विविध सायबर गुन्ह्यांचे प्रकार, डेटा गोपनीयता, सुरक्षित पासवर्ड, ऑनलाईन व्यवहारातील काळजी आणि सोशल मीडियावरील धोके यावर सविस्तर माहिती दिली.

या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ. बी.एस. सावंत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खोट्या अमिषाला बळी पडण्याचे आवाहनकेले समाजात जाऊन सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित केली. संगणक विभाग प्रमुख डॉ. आर.डी. भर यांनीप्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तर समन्वयक पी.. लोखंडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची खास आकर्षण ठरलेली विद्यार्थ्यांची सायबर सुरक्षिततेवर आधारित पथनाट्य सादरीकरण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारेहोते. यामध्येसायबर शिक्षासायबर सुरक्षाहा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

या वेळी प्रा. प्रियंका लोखंडे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेची शपथ दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर समाजातही सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीचा ठोस संदेश पोहोचला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *