साताऱ्यातील ऐतिहासिक पर्व – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नमो युवा रन (रन फॉर नशामुक्त भारत) – राजधानी सातारामॅरेथॉन २०२५” पत्रिकेचे अनावरण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :

साताऱ्याची ऐतिहासिक नगरी आता एका नवा इतिहास घडविण्यास सज्ज झाली आहे. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनेआयोजित नमो युवा रन (रन फॉर नशामुक्त भारत) – राजधानी सातारा मॅरेथॉन २०२५ या भव्य उपक्रमाच्या पत्रिकेचे अनावरणमहाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भव्यदिव्य वातावरणात पार पडले.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त करताना म्हटले :

व्यसनमुक्त भारतासाठी घेतलेली ही धाव केवळ मॅरेथॉन नाही, तर नव्या पिढीला व्यसनमुक्त जीवनशैलीकडे नेणारा महत्त्वपूर्ण टप्पाआहे. साताऱ्याच्या मातीतून होणारा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे सांगत शुभेच्छा दिल्या.

अनावरण सोहळ्यात भाजपा लोकसभा समन्वयक सुनील काटकर, काकासाहेब धुमाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मयकुलकर्णी, श्रवण जंगम, तेजस जगताप, प्रथमेश इनामदार, प्रवीण कणसे आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.

हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा निमित्त घेण्यात आला असून जिल्हाभरातूनयाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

भव्य मॅरेथॉन सोहळ्यात हे मान्यवर राहणार उपस्थित :

खा. . उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री . शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष. अतुल भोसले, . मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, . विक्रांत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशिलकदम, समन्वयक सुनील काटकर, माजी . दिलिप येळगावकर, मदन भोसले, आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमपावसकर, भरत पाटील, प्रियाताई शिंदे, रामकृष्ण वेताळ, अनुप मोरे, अविनाश कदम, संग्राम बर्गे, सुरभी भोसले आदींसह जिल्ह्यातीलमान्यवर नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

युवा शक्तीची जंगी तयारी :

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते या उपक्रमाच्या यशासाठी अहोरात्रप्रयत्न करत आहेत. भाजपा सरचिटणीस संतोष कणसे, विठ्ठल बलशेठवार, धनाजी पाटील, विकास गोसावी, मंडलाध्यक्ष अविनाशखर्शीकर, वैशाली टंकसाळे, महेश गाडे, विजय गुजर, बाळासाहेब खरात, अमोल सणस, प्रवीण धस्के, हृदयनाथ पार्टे, डॉ. दयानंदघाडगे, राहुल गोडसे, समीर निकम यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांची मोठी फौज कार्यक्रमासाठी कार्यरत आहे.

नमो युवा रनरन फॉर नशामुक्त भारत

ही फक्त धाव नाहीही एक शपथ आहे, व्यसनमुक्त भारताच्या दिशेने टाकलेलं मोठं पाऊल आहे. साताऱ्याच्या भूमीतून सुरु झालेलीही प्रेरणादायी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात घुमणार आहे.

राजधानी सातारा सज्जतरुणाईची ताकद, व्यसनमुक्त भारताचा संकल्प!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *