सातारा दि.१७
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये संपूर्ण देशात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात या कालावधीमध्ये महिलांसाठीचे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालय सातारा येथे या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचेहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक संचालक, हिवताप विभाग डॉ. प्रताप सारणीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मेजर राहुलदेव खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उप अधिष्ठाता डॉ.दास वाणी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोसावी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम, या अभियानाच्या जिल्हा नोडल ऑफिसर डॉ. सलमा इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शन करताना स्त्रियांबरोबरच सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे , डॉ. राहुल देव खाडे, यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व या अभियानांतर्गत अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अशा सर्व स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात एकूण 967 महिला रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
या कार्यक्रमास डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. राहुल जाधव, डॉ. अरुंधती कदम, डॉ. उत्कर्षा साळुंखे, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ. टकले, डॉ. किरण जाधव,आधिसेविका श्रीमती कळसेकर ,परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पुंड तसेच रुग्णालयातील व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैद्यकीय सामाजिक अधीक्षक व्यंकटेश गौर यांनी केले. तसेच प्रास्तविक व आभार प्रदर्शन डॉ. सुजाता राजमाने यांनी केले.












Leave a Reply