साताऱ्याच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा : साताऱ्याची शान, मराठ्यांचा अभिमान असलेला शाही दसरा महोत्सव आता राज्य पातळीवर झळकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी या वैभवशाली महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची ग्वाही दिली आहे.

या सोहळ्याचे मुख्य केंद्रबिंदू म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज. त्यांच्या घराण्याच्यापरंपरेमुळेच हा दसरा महोत्सवशाहीओळख प्राप्त करून आहे. प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने छत्रपतींच्या उपस्थितीने साताऱ्याचीपरंपरा अधिक तेजोमय होते.

या महोत्सवाच्या मान्यतेसाठी सातारा जिल्ह्यातील युतीतील आमदारांनी  याची मागणी केली होती. त्या मागणीचे पत्र महायुतीचे जिल्हासमन्वयक सुनिल काटकर तात्या यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केले असता, त्यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाददिला.

यापूर्वी पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पर्यटन जिल्हा नियोजन निधीतून भरीव मदतीचे आश्वासन दिले होते. तसेचसार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटीलयांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

बैठकीला काका धुमाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रावण जंगम, तेजस जगताप, प्रथमेश इनामदार, रविंद्र लाहोटी, प्रवीण कणसे उपस्थित होते.

आता शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने साताऱ्याची परंपरा, वैभव आणि छत्रपती घराण्याचा अभिमान आणखी भव्यपातळीवर देशविदेशात पोहोचणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *