कुकुडवाड परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा : कुकुडवाड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कुकुडवाडपुकळेवाडीमानेवाडीमायणी मार्गावरील घाडगे वस्तीजवळील पुल वाहून गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मायणीम्हसवड रोडवरील वाहतूकही ठप्प झाली असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायतराज मंत्री श्री. जयकुमारगोरे यांनी प्रशासनाला तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तोपर्यंत या धोकादायक मार्गाचा वापर टाळून नागरिकांनीसुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *