सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे २० सप्टेंबर रोजी इंजिनिअर्स डे व प्रदर्शनाचे आयोजन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या व्यवसाय नेटवर्किंग संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही इंजिनिअर्स डे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत साताऱ्यातील जिल्हा परिषद हॉल येथे २० सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रम व इंजिनिअरिंग प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती सॅटर्डे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या संस्थेची स्थापना २००१ साली माधवराव भिडे यांनी केली असून, तरुणांमध्ये उद्योगजागृती वाढवणे आणि त्यांना गुण व संचितीला योग्य दिशा देणे हा संस्थेचा उद्देश आहे. “एकमेकांस साहाय्य करून पुढे जाऊया” ही संस्थेची भूमिका आहे.

साताऱ्यासह महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि इंदूर येथील व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

सदस्य कार्यक्रम सातारा येथे पार पडणार असून, दुपारी २.३० पासून सुरुवात होईल. यावेळी प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले, आ.महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शन करण्याकरिता इंजिनिअर राहुल अहिरे, राजू जगताप, विलास अवचट, पुष्कर औरंगाबादकर यांच्या संविधान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे, व्यावसाईक हेड गिरीष घुगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमात अभियंता मार्गदर्शन व अनुभव कथनही होणार आहे.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यांमधील १२०० उद्योगजगतातील मान्यवर सहभागी होणार असून, कार्यक्रमात विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना, इंजिनिअर्स व आर्किटेक्ट्सचे मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम साताऱ्याच्या अभियांत्रिकी क्षेत्राला नवीन दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *