आता जनता चूप बसणार नाही, गनिमी काव्याने आंदोलन होईल भारी! निवेदनं, मेल्स, कॉल्स – काही कामाचं नाही, आता रस्त्यावर उतरणार – हाच अंतिम मार्ग आहे!”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :
आंदोलनाची घोषणा
प्रशासन झोपेत, कलेक्टर साहेबांना वेळ नाही,

पुलं पडली तरी त्यांना पर्वा नाही.
मान-सन्मान सगळ्यांना मिळतो,
पण सर्वसामान्यांचा विचार करणार कोण?

सातारा–लोणंद (965D) मार्गावरील वाढे–वडूथ पूलांची दयनीय अवस्था पाहून जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे. सततच्या पावसामुळे हे पूल पाण्याने भरून अपघातांची शक्यता निर्माण झाली असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. कलेक्टरांनकडे वेळ नाही, NHAI ने डोळे मिटले आहेत, आणि नागरिकांना मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

भाजयुमोचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की,
“आता निवेदनं, पत्रं, कॉल्स यांचा काही उपयोग नाही. जनता आता गप्प बसणार नाही. गनिमी काव्याच्या पद्धतीने जोरदार आंदोलन होणार आहे. प्रशासनाने त्वरित काम सुरु केले नाही, तर रस्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी NHAI व प्रशासनाची असेल.”

प्रशासन झोपेत आहे,

कलेक्टरांना वेळ नाही,
पूल झाले ‘स्विमिंग पूल’,
आता जनता गप्प बसणार नाही!

निवेदनं संपलीत,
आता गनिमी काव्याचं आंदोलन पेटणार!
रस्ता रोकोशिवाय पर्याय नाही

– मदन साबळे
जिल्हा सचिव, भाजयुमो सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *