जलतरणात कस्तुरी साबळेचा ‘त्रैज्य’ विजय विभागीय जलतरण स्पर्धेसाठी पात्रता; साताऱ्याचा लौकिक वाढविला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा :

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने झालेल्या शालेय जलतरण स्पर्धेत इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडूथ विद्यालयाची विद्यार्थीनी कस्तुरी अमोल साबळे हिने दणदणीत कामगिरी केली.

१४ वर्षाखालील मुलींच्या गटात तिने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक व २०० मीटर वैयक्तिक मिडले या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ४ x १०० मीटर फ्री स्टाईल रिले आणि ४ x १०० मीटर मिडले रिले या गटस्पर्धांमध्ये तिने द्वितीय क्रमांक मिळवला.

या भव्य यशामुळे कस्तुरीची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या यशामागे प्रशिक्षक विजय साबळे, साबळे परिवार, तसेच सुधीर चोरगे, महेश मिलके, गौरी मिलके यांचे मार्गदर्शन लाभले.

कस्तुरीच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून विभागीय पातळीवरही ती साताऱ्याचा झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *