सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये सातारा, येथून नुकतीच बीबीए पदवी संपादन केलेल्या सृष्टी अंकुश शिंदे हिला ऑक्सफर्ड ब्रोक्स युनिव्हर्सिटी, यूके मध्ये एम.एस. इन इंटरनॅशनल बिझनेससाठी प्रवेश मिळाला आहे.
इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थी श्री अमोल उनउने यांनी प्राचार्य शंकरराव उनउने यांच्या स्मरणार्थ सृष्टीला ₹50,000 ची शिष्यवृत्ती जाहीर केली. यावेळी त्यांनी सांगितले की, भविष्यात इन्स्टिट्यूटमधून परदेशात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास अशाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉ. एस. एस. भोला यांनी दिले, अध्यक्षीय भाषणात डॉ. बी. एस. सावंत यांनी संस्थेच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. विविध मान्यवरांनी सृष्टीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर डॉ. एस. आर. निकम यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन प्रा. प्रियांका शिंदे यांनी उत्कृष्टरीत्या केले, आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.












Leave a Reply