“निस्वार्थी सेवेतून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजित दादा – आमदार व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना”

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लातूर/सातारा :

भारतीय जनता पार्टी लातूर शहराध्यक्ष अजित पाटील (दादा) काव्हेकर यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणिसामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजप सातारा जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दादांना मनःपूर्वक शुभेच्छादेत भावनिक संदेश दिला.

साबळे म्हणाले – “अजित दादा कायम निस्वार्थीपणे काम करतात. दिवस असो वा रात्र, ते वेळ पाहत नाहीत; जनतेच्या अडचणी दूरकरण्यासाठी सदैव धावून येतात. दादांची कार्यशैली ही प्रामाणिकपणा आणि जनसेवेच्या निष्ठेचं प्रतीक आहे. आमची मनापासूनचीप्रार्थना आहे की दादा लवकरच आमदार व्हावेत आणि अधिक व्यापक पातळीवर जनतेची सेवा करावी.”

लातूरमध्ये आज कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यांसारख्या उपक्रमांनी दादांचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावरजनतेचे खरे दादाम्हणून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, नागरिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अजित दादांच्या नेतृत्वामुळे भाजप लातूर शहर संघटन अधिक बळकट झालं आहे. जनतेशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आणिनिस्वार्थी सेवा हीच त्यांची खरी ताकद असल्याचं पदाधिकाऱ्यांचं मत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *