सातारा :
ऑनलाईन युगामुळे वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल आणिइंटरनेटद्वारे दैनंदिन व्यवहार सुलभ झाले असले तरी बँक खाते हॅकिंग, फेक कॉल्स, खोट्या वेबसाईट्स व लिंक यामुळे नागरिक मोठ्याप्रमाणात आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी एक अनोखाउपक्रम हाती घेतला आहे.
समाजजागृतीसाठी युवतींचा पुढाकार
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये व क्विक हिल फाऊंडेशन यांच्यासंयुक्त विद्यमाने सायबर जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत बीसीएच्या विद्यार्थिनी समृध्दी जगताप व वैष्णवी शिर्केयांनी विशेष पुढाकार घेतला.
या उपक्रमाअंतर्गत अनंत इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शनकरण्यात आले.
सायबर गुन्हे – विद्यार्थ्यांना दिले प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन
कार्यक्रमात सोशल मीडियावरून होणारे गुन्हे, ऑनलाईन बँकिंग फसवणूक, फेक कॉल्स, फसव्या जाहिराती व खोट्या वेबसाईट्सयाबाबत माहिती देण्यात आली.
त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी आवश्यक उपायांवर भर देण्यात आला. यामध्ये
टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन
मजबूत व गुप्त पासवर्डचे महत्त्व
संशयास्पद लिंक व वेबसाईट्सपासून सावध राहणे
याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेले.
“सायबर शपथ” घेऊन विद्यार्थ्यांची डिजिटल जबाबदारी
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर शपथ घेतली.
“आम्ही जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून सोशल मीडियाचा व ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करू; फसवणूक व चुकीची माहितीटाळण्यासाठी सतर्क राहू,” अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतल्याने वातावरणात उत्साह पसरला.
शिक्षकांकडून उपक्रमाचे कौतुक
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, डॉ. आर. डी. कुंभार व प्रा. पी. ए. लोखंडे यांनी केले. विद्यार्थिनींनी केलेलेप्रेझेंटेशन व उपक्रम पाहून उपस्थित शिक्षकांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
सायबर सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारी मोहिम
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यनागरिकांनाही सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यास उपयुक्त ठरत आहेत.












Leave a Reply