सातारा: हवालदारवाडी ता माण जिल्हा सातारा येथे लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपूर्वी दुरुस्ती चे काम हाती घेण्यात आले होते परंतु त्या कामाची दुरुस्ती झाली आहे की नाही हा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडला आहे.
या बाबत रंग कामगार सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धनाजीराव सावंत यांनी दिलेली माहिती अशी आहे की हवालदारवाडी ता माण जिल्हा सातारा येथील तलावाची गेल्या दोन वर्षात लघुपाटबंधारे विभागाने तोडफोड केली होती त्या नंतर त्याची दुरुस्ती करण्यात आले नाही असे लक्षात येते आहे. या तलावाची गळती बंद झाली नाही गळती बंद करण्याचे कोणतेही काम आजपर्यंत केले नाही या बाबत असे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी माण याना दिले आहे. आज पावसामुळे तलावा पूर्णपणे भरलेला आहे या तलावाचे गेल्या तीन वर्षात फरशी वाढवण्याचे काम केले आहे. त्या मुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे या तलावाखाली लोकवस्ती आहे त्या मुळे लोकांच्या मध्ये भीती चे वातावरण पसरले आहे जर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार लघुपाटबंधारे विभाग असेल असे गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.












Leave a Reply