अधिकाऱ्यांचे आवाहन आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करा. अन्यथा खरीप हंगामातील ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा

अधिकाऱ्यांचे आवाहन

वडूथ ग्रामसेवक व तलाठी कार्यालयाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,

“आपल्या शेताची ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करा. अन्यथा खरीप हंगामातील ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही. शेतकरी बांधवांनी यात विलंब करू नये.”

शेतकऱ्यांना ७/१२ मिळण्यासाठी ई-पिक पाहणी बंधनकारक

राज्य शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ पासून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय लागू केला आहे. आता ई-पिक पाहणी पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांना ७/१२ उतारा उपलब्ध होणार नाही.

ग्रामपंचायत व महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या मोबाईलवर “ई-पिक पाहणी (e-Peek Pahani)” हे अॅप डाउनलोड करून आपल्या शेताची व पिकांची नोंदणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

🟢 ई-पिक पाहणी का महत्वाची?

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील प्रत्यक्ष पीकस्थितीची नोंद शासनाकडे तात्काळ उपलब्ध होईल.

पिकांचा विमा, कर्जमाफी, अनुदाने, शासकीय योजना यांचा लाभ तत्काळ व अचूक मिळणार.

जमिनीवरील खरी पिकस्थितीच्या आधारेच पुढील शासकीय निर्णय व मदत मिळेल.

🟢 शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना:

आपल्या मोबाईलवर e-Peek Pahani App त्वरित डाउनलोड करा.

आपल्या शेताची व पिकांची माहिती नीट भरून वेळेत सबमिट करा.

पाहणी पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ७/१२ उतारा ऑनलाइन किंवा तलाठी कार्यालयातून मिळणार आहे.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *