एआय तंत्रज्ञानाचे ज्ञान ही काळाची गरज साताऱ्यात पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा -प्रतिनिधी

संगणक आणि मोबाईल वापर ही मानवी गरज झाली आहे. त्याच्या सुरक्षित वापराबद्दल ज्ञान नसल्याने हॅकर ऑनलाईन फसवणूक करतात. सायबर सिक्युरिटी सोबत एआय तंत्रज्ञानाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. पत्रकारांनी स्वतः ज्ञान घेऊन सामाजिक बांधिलकीतून इतरांना याबाबत सतर्क आणि सक्षम करावे, असे आवाहन संचालक डॉ.बी.एस. सावंत यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आणि केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सोबत सातारा तालुका, शहर पत्रकार संघाने पत्रकारांसाठी सायबर सिक्युरिटी आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर यावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी वर्ये येथे केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये संगणक लॅबमध्ये ही प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सराव अशी ही कार्यशाळा पार पाडली.

कार्यशाळेचे उद् घाटन केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ.बी.एस.सावंत , पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, सुनिल साबळे, किरण गाडे ,प्रा.प्रियांका लोखंडे आदींच्या उपस्थितीत झाले.

सायबर सिक्युरिटी बाबत ओमकार कदम, आयुष माने आणि टीमने अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी माहिती दिली. तर प्रा.प्रियांका लोखंडे यांनी, उपस्थित पत्रकारांना विविध एआय तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा हे प्रत्यक्षात संगणकावर सराव करत प्रशिक्षण दिले. याच बरोबर तंत्रज्ञानाचे संभाव्य धोके याबाबत दक्षता काय घेतली पाहिजे, याची अत्यंत उपयुक्त माहिती दिली.

प्रास्ताविक प्राचार्य विजय जाधव तर सुत्रसंचलन जान्हवी चोरगे आणि नेहा चिंचकर तर आभार प्रा.प्रियांका लोखंडे यांनी मानले.

 

 

केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी
सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती करणारे प्रबोधनपर प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले.
.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *