सातारा-लोणंद मार्गाच्या दुरावस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा

सातारा जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग असलेला सातारा-लोणंद (९६५ डी) मार्गाची दुरावस्था तसेच वडूथ आणि वाढे येथील पुलांच्या दुरावस्थेबाबत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना शुक्रवारी देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, या महामार्गावरील वडूथ, वाढे येथील दोन्ही पूल ऐतिहासिक यांची वडूथ येथील पुलाची महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंचनालय खात्यामध्ये नोंद आहे. तरी या मार्गावरील असणारी अवजड वाहतूक लक्षात घेता बंद करावी कारण, या दोन्ही पुलांना १८० वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी याबाबत गणेशोत्सवापूर्वी निर्णय घ्यावा. तसेच या मार्गाच्या रुंदीकरणाच्या सद्य परिस्थितीबाबत लोणंद ते सातारा पर्यंत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करून योग्य ती माहिती अवगत करावी. यासह विविध मागण्यांचा विचार करावा, अन्यथा या भागातील सर्व ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *